HW News Marathi
महाराष्ट्र

दाभोळकर-पानसरे कुटुंबियांना उच्च न्यायालयाने सुनावले

मुंबई । मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. दाभोळकर आणि कॉ. पानसरे यांच्या कुटुंबियांच्या वारंवार माध्यमांसमोर जाण्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दाभोळकर आणि पानसरे कुटुंबियांनी माध्यमांसमोर जाऊन बोलणे योग्य नाही, असे उच्च न्यायालयाने आहे.

दाभोळकर हत्या प्रकरणात आता अटक करण्यात आलेले आरोपी नक्की तेच आहेत ना याची खात्री करून घ्या. नाहीतर खरे आरोपी बाहेर मोकाट राहतील, अशी शंका यावेळी न्यायालयाने उपस्थित केली.

पत्रकार परिषदेवर नाराजी

त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदवरदेखील उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. “प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर जाऊन सर्व पुरावे उघड करणे हे आम्हाला बिलकुल पटले नाही”, असे न्यायालयाने सुनावले.

इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका

इतर तपास यंत्रणांवर अवलंबून न राहता स्वतःचा स्वतंत्र तपास सुरू ठेवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने यावेळी कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्याऱ्या एसआयटीला दिली.

सीबीआय आणि एसआयटीने डॉ. दाभोळकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आपल्या तपासाचा प्रगती अहवाल आज (गुरुवारी) उच्च न्यायालयात सादर केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संभाजीराजेंसमोर जर काही भूमिका मांडायची असेल तर ती मी पुण्यात मांडेन!

News Desk

भारत भालके यांच्या जागी पार्थ पवार यांची नेमणूक होणार?

News Desk

माझ्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या म्हणजे केवळ अफवाच !

News Desk
मुंबई

संविधानाची प्रत जळणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात लोककलावतांचा निषेध मोर्चा

News Desk

मुंबई | लोककलावतांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई लोककलावंत सांस्कृतिक मंच अध्यक्ष विष्णू शिंदे ल यांच्या मार्गदर्शनाखाली ६ सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

दिल्लीत जंतर मंतर येथे भारतीय संविधानाची प्रत जळणाचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपमानजनक घोषणा देणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात लोककलावतांकडून आज आझाद मैदान येथे आम्ही समाजकंटकांचा काव्यमय निषेध करतो. तसेच त्या सर्वाना अटक व्हावी यासाठी निषेध मोर्चाचे आयोजन केलं आहे. असे गायक विष्णू शिंदे यांनी सांगितले.

Related posts

पश्चिम रेल्वेची चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनोखी भेट

News Desk

पेट्रोल १५ पैशांनी, डिझेल १४ पैशांनी स्वस्त

News Desk

मुंबईतही रिपाइंला भाजपकडून सापत्न वागणूक

News Desk