HW News Marathi
महाराष्ट्र

शहिदांच्या कुटूंबाचा असाही होणार सन्मान

मुंबई- प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाचा ध्वाजारोहणाचा कार्यक्रम सरकार मार्फत आयोजित केला जातो. या कार्यक्रमांना या पुढे शहीद जवानांच्या कुटूंबीयांना रितसर सरकारी पाहूणे म्हणून निमंत्रीत केले जाणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याआधी स्वातंत्र्या सैनिकांना असे निमंत्रण दिले जात होते. आता शहीदांच्या कुटूंबीयांना हे निमंत्रण दिले जाणार आहे.

प्रजासत्‍ताकदिनी मुंबई येथे राज्‍यपालांच्या हस्‍ते व स्‍वातंत्रयदिनी मुख्यमंत्रयांच्या हस्‍ते ध्वजारोहण करण्यात येते त्याच बरोबर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींसह इतर मान्यवरांना बोलवले जाते. अशा कार्यक्रमांत देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांच्या कुटूंबीयानी सरकारी पाहूणे म्हणून सन्मानाने बोलवावे असा प्रस्ताव सरकार दरबारी होता. त्याला अखेर मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये शहीद जवानांची वीर पत्नी, मुले आणि आईवडीलांना निमंत्रीत केले जाईल. शिवाय कार्यक्रमापर्यंत येण्यासाठी सर्व सोई सुविधाही सरकार मार्फत पुरवल्या जाणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात कृषी विधेयकावरून शेतकऱ्यांचे आंदोलन!

News Desk

मनसेच्या आपत्ती व्यवस्थापनाची राज ठाकरेंकडून घोषणा, कसं असेल पथक?

News Desk

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात

News Desk