मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (१८ जून) शेवटचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत दुपारी २ वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २०१९-२०२० चा आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
महा अर्थसंकल्प २०१९
मंगलवार १८ जून २०१९ रोजी दुपारी १.४५ पासून#MahaBudget2019
Tuesday, June 18, 2019, 1.45pm onwards pic.twitter.com/K64mF1SUJk— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) June 17, 2019
सातव्या वेतन आयोगाची थकबाकीबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी घोषणा अपेक्षित आहे.विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडतील. यापार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांनी सोमवारी (१७ जून ) अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवला. फेबुवारी महिन्यात मांडण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी, सिंचन, आरोग्य, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांना भरभक्कम निधी देण्यात आला होता. त्या निधीची पुढील तरतूद या अर्थसंकल्पातही असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.