HW News Marathi
महाराष्ट्र

“शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू”, सुधीर मुनगंटीवारांची माहिती

मुंबई | ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची (chhatrapati shivaji maharaj) जगदंबा तलवार (Jagdamba Talwar) परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले असून ही जगदंबा तलवार 2024 पर्यंत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारण, 2024 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होणार आहेत, अशी माहिती मुनगंटीवारांनी दिली आहे.

 

मुनगंटीवार म्हणाले, “महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पतर यावी. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत. ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक झाल्यानंतर आता केंद्र सरकार जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला 2024 मध्ये 350 वर्षे पूर्ण होईल. यासाठी आम्ही राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आम्ही एक आराखडा तयार करण्यात येत असून जर महाराजांची जगदंबा तलवार भारतात परत आली. तर आमचा आनंद मिळेल.”

तसेच इंग्लंडचे प्रिन्स 1875-76 साली भारतात आल्यानंतर त्यांना शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार यांच्या अनेक मौल्यवान वस्तू भेट वस्तू म्हणून देण्यात आल्याची माहिती इतिहासातून मिळते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस कितीही प्रयत्न करा, बिघाडी काही होत नाही उलट आघाडी सरकार मजबूत होईल !

News Desk

राज्यात दिवसभरात ६ हजार ३८४ जण करोनामुक्त; १०५ रूग्णांचा मृत्यू!

News Desk

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या कानाखाली आवाज काढू, प्रसाद लाडांचा इशारा

News Desk