HW News Marathi
देश / विदेश

जाणून घ्या…’या’ कर्तृत्वान महिलेने पंतप्रधान मोदींच्या अकाउंटवरून केले पहिले ट्वीट

नवी दिल्ली | जागतिक महिला दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार त्यांचे सोशल मीडिया अकाउंट कर्तृत्वान महिलांकडे सोपविले आहे. मोदींच्या ट्विट हँडलवरून पहिले ट्वीट फूड बँकेच्या संस्थापनक स्रेहा मोहन दास यांनी केले आहे. स्नेहा यांनी त्यांच्या फूड बँकेची माहिती दिली.

यात स्नेहा दास यांनी सांगितले की, ” मी २०१५मध्ये चेन्नईत पूर येण्यापूर्वी फूड बँकची स्थापना केली होती. ही बँक स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे भुकेशी लढणे आणि भारतात कुणीही भुकेला राहणार नाही. माझ्या आजोबांच्या जन्मदिनानिमित्त माझी आई मुलांना बोलावून त्याना जेवण देत असे. हे काम पुढे नेण्याची माझा संकल्प होता. यातूनच फूड बँकेची कल्पना पुढे आल्याचे त्या सांगतात.” स्नेहा दास यांनी मोदींच्या ट्वीटवर व्हिडिओद्वारे तिच्या उपक्रमाची माहिती दिली.

स्नेहा दास पुढे म्हणाल्या की, “मी फेसबुकवर फूड बँक – चेन्नई असे पेज तयार केले. या पेजच्या माध्यमातून मी लोकांशी जोडली गेले. या पेजला जोडल्या गेलेल्या लोकांनी त्यांच्या राज्य, शहर यांच्या नावाने फूड बँकचे पेज तयार करण्याचे आवाहन केले. यानंतर भारतात आताच्या घडीला १८ ठिकाणी फूड बँक सुरू झाल्या आहे. तसेच भारता बाहेर दक्षिण आफ्रिकेतही फूड बँक सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच फूड बँकेचे स्वयंसेवक जेवणासाठीचे सारे सामान लोकांकडून दानस्वरुपात घेतात. त्यानंतर जेवण तयार करून ते गरिबांना वाटतात. ज्या-ज्या घरात वाढीव अन्न तयार होते, अशी कुटुंबे आपले उर्वरित ताजे जेवण फूड बँकेत जमा करतात.”

पंतप्रधान मोदी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देणार ट्वीट केले. मोदी म्हणाले की, “नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, अशा शब्दांत मोदींनी महिलांचा गौरव केला आहे. , मी गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणाल्याप्रामाणे माझे सोशल मीडिया अकांउट साईन करत आहे. आज दिवसभर कर्तृत्व गाजवणाऱ्या ७ महिला माझ्या सोशल अकांउंटवरून त्यांचा प्रवास, आणि त्यांनी केलेल्या कामगिरीविषयी सांगणार आहेत.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना EDने ‘या’ प्रकरणी बजावली नोटीस

Aprna

#Lockdown2 : २० एप्रिलनंतर देशातील ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन शिथील होणार

News Desk

सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरुर यांना जामीन मंजूर

News Desk