HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंच्या भविष्यवाणीवर महाविकासआघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र

मुंबई | “मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही,” अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली आहे. राज्यात अनोगोंदी कारभार असून भाजपचे सरकार नाही, त्यामुळेच असे होत आहे, असे राणेंनी आज (२६ नोव्हेंबर) दिल्लीत प्रसार माध्यमांंशी बोलताना म्हणाले.

माझ्या मनात काही गोष्टी तर आहे. पण मी त्या आताच सांगणार नाही. राज्यात नवे सरकार पाडायचे असेल किंवा नवे सरकार आणण्याचे असेल. तर काही गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात, असा इशारा देखील राणेंनी दिला आहे. राणे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हे आजारी असल्यामुळे आजारी माणसाचे नाव घेऊन काही बोलणे योग्य वाटणार नाही. परंतु महाविकाआघाडी सरकारचे लाईफ अधिक नाही, असे सूचक विधान राणेंनी केले आहे. राणेंच्या भविष्यवाणीवरून राजकीय वर्तुळा चर्चा सुरू झाल्या आहेत.

राणेंवर महाविकासआघाडीच्या नेत्यांची टीका

महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, पत्रकारांच्या याविषयावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब बोलताना म्हणाले, “नारायण राणे काय म्हणतात, त्यावर सरकार चालत नाही. तर संख्याबळावर सरकार चालते, असा टोला त्यांनी लगावला. परबांनंतर राज्यचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर टीका करत ते म्हटले, “देवेंद्र फडणवीस महाविकासआघाडी सरकार पडेल ही भविष्यवाणी करून थकले. यानंतर चंद्रकांत पाटील देखील हेच बोलत होते. आता नारायण राणेंनी भविष्यवाणी करण्याचे टेंडर घेतले आहे. २३ वर्षाच्या नवसामध्ये काही लोकांकडे इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावे लागते, असे म्हणत तोफ डागली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“५०० कोटी देण्याची ताकद आहे?”; धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर पंकजा संतापल्या

News Desk

कोल्हापूर देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर

News Desk

“त्या बार चालकांना अद्याप अटक का नाही?” काँग्रेसचे ईडीला ४ सवाल!

Gauri Tilekar