HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिकमध्ये अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना अटक

नाशिक। राज्यात सध्या मराठा आरक्षणासाठी वातावरण चांगलेच ढवळून निघालय. याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकाणी मराठा कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याविरोधात मोठमोठ्याने याठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर असतांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात आंदोलन करणाऱ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी या वेळी ताब्यात घेत अटक केली आहे. मराठा कार्यकर्ते अजित पवारांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र पोलिसांनी ताफा येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तर मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार जाणून बुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय.

बीड मध्ये काय घडलं होतं?

गेल्या काही दिवसांपूर्वी बीडमध्येही वैद्यकीय सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजित पवार यांची गाडी अडवली होती. गाडी समोर झोपण्याचा प्रयत्न या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लाठीमारही केला होता. आक्रमक कर्मचाऱ्यांनी थेट अजित पवार यांच्या गाडी समोर उडी घेतली. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील स्थितीबाबत पवारांना चिंता, सरकार लवकर स्थापन व्हावे !

News Desk

स्वारातीम विद्यापीठाच्या १८ व १९ एप्रिल  रोजीच्या परीक्षांच्या तारखेत बदल                     

News Desk

“जिल्हा परिषदेच्या निकालाने ना आनंदी, ना दु:खी, पण…”- अजित पवार

News Desk