HW News Marathi
महाराष्ट्र

‘म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा शुभारंभ शरद पवारांच्या हस्ते…

मुंबई | कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज पार पडला.

महाविकास आघाडी सरकार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून याचा शुभारंभ आज पार पडला. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते.

 

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट काय होतं?

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला… कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला.” शरद पवार यांच्या या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी म्हटलं आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत.”

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गेल्या काही दिवसांत ३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ते राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नव्हते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते त्यांच्या कामाला पहिल्यासारखी सुरुवात करतील, असं ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलं होतं. विशेष बाब म्हणजे शरद पवार यांनी कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाला यापूर्वीचं हरवलेलं आहे. त्यामुळे आताच्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे त्यांनी कॅन्सर पिडीतांच्या नातेवाईकांच्या व्यवस्थेसाठी टाटाला देण्यात येणाऱ्या खोल्याबाबतची विचारपूस करणं स्वाभाविक आहे.

म्हाडा टाटा कॅन्सर हॉस्पिटलला घरे देणार

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागल्याचं आपण पाहिलं किंवा ऐकलं असेल. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने त्यांचे १०० प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु, 12 उमेदवार रिंगणात

News Desk

सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे..अजित पवार!

News Desk

ED, CBIच्या धाडीनंतर किरीट सोमय्या विचारतात, “प्रताप सरनाईक कुठे आहात?”

News Desk