मुंबई | राज्य सरकारने महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे.
“सध्याच्या परिस्थितीत ५ टप्प्यांमध्ये अनलॉक आणि लॉकडाउन केलं जाणार आहे. या ५ टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिलीआहे.
“पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना १०० टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील १०० टक्के उपस्थितीची परवानगी असेल”, असं वडेट्टीवार म्हणाले.
पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे अनलॉक होणार
पहिला टप्पा
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे,वर्धा, वाशिम, यवतमाळ
दुसरा टप्पा
काही निर्बंध शिथिल करणार
मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार
मुंबई लोकल इतक्यात सुरू होणार नाही.
Positivity रेट वर लोकल सुरू करण्याचा निर्णय घेणार
तिसऱ्या टप्प्यात हे जिल्हे अनलॉक होणार
अकोला, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी
चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात काही अंशी निर्बंध तसेच असणार आहेत. पाचव्या टप्प्यात पुर्ण लॉकडाऊन असणार आहे.
We have prepared a 5-level unlock plan for the State on the basis of positivity rate and status of occupancy of oxygen beds in the districts. Districts with the lowest positivity rate will have no restrictions: Maharashtra minister Vijay Wadettiwar pic.twitter.com/uddFLf2gqH
— ANI (@ANI) June 3, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.