HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई

वॉशिंग मशीन आणि गुजरातचा ‘निरमा’चा बॅनर; ‘मविआ’चे सरकारविरोधात आंदोलन

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे (Maharashtra Budget Session) शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा (24 मार्च) सतरावा दिवस आहे. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी गुरुवारी (23 मार्च) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोडे मारो आंदोलन केले. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद विधानभवनात देखील पडलेचे पाहायला मिळाले होते. या गोंधळामुळे विधानसभा तहकूब देखील करण्यात आली होती. आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विधानभवनाच्या पायऱ्यांवर गुजरातची निरमा आणि वॉशिंग मशीनचे बॅनर घेऊन सरकारविरोधात आंदोलन दिले.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सतरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. गुजरातची निरमा आणि वॉशिंग मशीनचे बॅनर घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

 

गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा… पन्नास खोके, एकदम ओके…गुजरात निरमा… ईडी, सीबीआय, आयटी मागे नाही लागणार… वॉशिंग मशीन खोके, आणि गुजरातचा निरमा, महाशक्तीला पाठिंबा द्या आणि क्लीनचीट मिळवा… गुजरात निरमा अभियान, चला पवित्र होऊन येऊ…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार निदर्शने केली.

 

 

Related posts

संप सुरू असला तरी बरेच कर्मचारी कामावर येण्यास तयार | एसटी महामंडळ

News Desk

महाराष्ट्रात नवीन सरकार निश्चित बनेल !

News Desk

कडकनाथ कोंबडी घोटाळ्याने घेतला पहिला बळी

swarit