HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“…मिशा काय, भुवया पण काढून टाकेन”, उदयनराजेंचे शिवेंद्रराजेंना आव्हान

मुंबई | “उदयनराजेंनी पैसे खाल्ले. तसे कोणी बोलले तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन”,  असे आव्हान खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) भोसले यांनी भ्रष्टाचाराच्या आरोप करणाऱ्या भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांना केले आहे. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोघांमध्ये नेहमची आरोपाच्या फैरी झाडत असतात. नुकतेच शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

 

उदयनराजेंना बुद्धीचा भाग नाही त्यांचा कमिश्नचा धंदा आहे, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या आरोपावर उदयनराजे भोसले म्हणाले, “माझे एक ठाम मत आहे. एकदा यासमोरासमोर या. आम्हाला सांगा आम्ही कुठे भ्रष्टाचार केला आहे. आणि काय केलाय. आम्ही मान्य करू.” पुन्हा उदयनराजे भोसले माध्यमांशी बोलताना म्हणाले, “त्या लोकांमध्ये माईक आणि सांग द्या की उदयनराजेंनी पैसे खाल्ले जर तसे कोणी बोलले तर देवाशपथ सांगतो.  मिशा काय, भुवया पण काढून टाकेन आणि  परत तोंड ताखवणार नाही.”

 

उदनराजेंनी ज्यांच्या जीवावर संस्था स्थापन केल्या. ते सर्वांना माहिती आहे. मला सांगताना लाज वाटते, बोलतानासुद्धा कमीपणा वाटतो. मला बोलू की नको असे झाले. परंतु, अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, महिला बँक आणि इतर संस्थाद्वारे त्यांनी पैसे खाल्ले. दुर्दैवाने मला सांगावेसे वाटते की, असे लोक मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे?, आमच्या दारात कधी कोण आले नाही. आई-बहिणींवरून कोणी आम्हाला शिव्या दिल्या नाहीत.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचे पुढारपण ऑनर किलिंगच्या वाढत्या धब्ब्यांनी काळवंडले जात आहे का?

News Desk

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

News Desk

HW Exclusive : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीदरम्यान भाजपकडून पैशाचे वाटप?, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Chetan Kirdat