HW News Marathi
Covid-19

महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करावा !

मुंबई | “शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी,” अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हेल यांनी केली आहे. यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

अमोल कोल्हेंनी ट्वीटमध्ये म्हटले, “महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी,” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केले आहे.

छोट्या पडद्यावर अमोल कोल्हे यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत. अमोल कोल्हेंच्या या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. मात्र, महापुरुषांच्या दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख नसल्याने अमोल कोल्हे अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णाला आता नातेवाइकांना भेटण्याची परवानगी – राजेश टोपे

News Desk

मुंबईत रोगप्रतिकारशक्ती विषयक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे – मुख्यमंत्री

News Desk

उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्यात पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक सुरु, लॉकडाऊनवर चर्चा

News Desk