HW News Marathi
देश / विदेश

मोदींना ‘चिनी खुळखुळे’ भेट, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अनोखे आंदोलन

मुंबई | चीनने केलेल्या हल्ल्यात आपले जवान शहीद झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज (१८ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चिनी खुळखुळे’ भेट पाठवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. चीन सातत्याने भारतावर हल्ले करत आहे. त्यामध्ये आपले जवान शहीद होत आहेत परंतु केंद्रसरकार यावर ठोस पावले उचलताना दिसत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी लहानसहान गोष्टीवर ट्वीट करत असतात मात्र चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय मोदींनी यासंदर्भात ठोस पावलेही उचललेली नाही. त्यामुळे आता मोदींनी चीनला ‘लाल डोळे’ दाखवायची वेळ आली आहे. तुम्ही त्यांना ‘लाल डोळे’ दाखवा पुर्ण देश तुमच्या सोबत आहे असे मेहबूब शेख यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे. दरम्यान चीनच्या हल्ल्यानंतर कोणतीच भूमिका न घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनच्या वस्तूमधील ‘खुळखुळा’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भेट म्हणुन पाठवून केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जैश-ए-मोहम्मद कडून स्टील बुलेटचा वापर

News Desk

Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय-बच्चन यांना EDकडून समन्स

Aprna

विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

News Desk