HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तरुणाईचे आक्रंदन रॅपच्या माध्यमातून, राष्ट्रवादीचा अनोखा प्रचार

मुंबई | विधासभा निवडणुकीच्या सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर सर्व पक्षांनी प्रचार रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आणि उमेवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस रॅपच्या माध्यमातून राज्य सरकारव टीक केली आहे. राष्ट्रवादीचे रॅप सध्या सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादीने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर रॅप शेअर केले आहे. राष्ट्रवादी पक्षाने ट्विटरवर रॅप करणाऱ्या मुलांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. राष्ट्रवादीने “विकासाच्या नावाखाली राज्य तुम्ही करायचे आणि सांगा आम्ही बेरोजगार तरुणांनी पोट कसे भरायचे? महाराष्ट्रातील तरुणाईचे आक्रंदन रॅपच्या माध्यमातून…” असा मजकूर असलेली पोस्ट लिहून हे रॅप गाणे ट्वीट केले आहे.

या रॅपमध्ये भाजप केवळ विकासाच्या नावाखाली राज्य करत आहेत. परंतु, महाराष्ट्रातील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. याकडे भाजप दुर्लक्ष करत आहे. शेतकरी कर्जात बुडला आहे, असेही या रॅपमध्ये सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करुन राष्ट्रवादीने तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे. विधानसभा निवडणूक येत्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रजा अकादमीवर बंदी घाला नाहीतर…..”, नितेश राणेंचं सूचक ट्विट!

News Desk

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांबद्दल जाणून घ्या ‘ही’ माहिती

News Desk

मनसे नेत्यामुळे कॉंग्रेसच्या नगरसेवकाचं गेलं पद !

News Desk