HW News Marathi
Covid-19

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २०० च्या वर पोहोचली

सातारा | राज्यातील सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २०० च्या वर पोहोचली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही १००च्या वर गेली आहे. साताऱ्यात काल (२१ मे) १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये खटाव तालुक्यातील सारी आजाराचा एक रुग्ण आहे.

सातारा जिल्ह्यात काल वाढ झालेल्या रुग्ण हा मुंबईहून आलेले आहेत. एकूण ९ कोरोना रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील आसरे, कोरेगाव तालुक्यातील भीमनगर, सातारा तालुक्यातील आसनगाव १, रायघर १, कास खुर्द १, जावली तालुक्यातील वरोशी १, गावडी १, फलटण २ येथील रुग्णांचा समावेश आहे.

त्याव्यतिरिक्त खटाव तालुक्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील मायणी १, निमसोड २, गारेवाडी १ येथील रुग्ण आहेत. तसेच खटावमध्ये सारीची लागण झालेला एक रुग्ण आहे. तसेच जिल्ह्यात पाटण तालुक्यातील धामणी गावच्या एकाला आणि कराड तालुक्यातील शामगाव येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive | MPSC च्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू !

News Desk

महाराष्ट्रात आज ३००७ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

स्वार्थी राजकारणासाठी जोमात, सामाजिक प्रश्नावर कोमात ! ‘लोकल’च्या वादात रोहित पवारांची उडी 

News Desk