HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२९७ वर, गेल्या २४ तासांत १६२ नव्या रुग्णांची भर

मुंबई | देशभरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन जाहीर केला आहे. तरी सद्धा देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जात आहे. राज्या गेल्या २४ तासात १६२ नव्या रुग्णांची भर पडली असून आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १२९७वर येऊन पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागने दिली आहे.

राज्यातील १२९७ रुग्णपैकी एकट्या मुंबईत १४३ अढळे असून मुंबईतील रुग्णांची संख्या ८५७ वर गेली आहे. तर मुंबई पाठोपाठ पुणे शहर १६८, पिंपरी-चिंचवड २२, पुणे ग्रामीण १४, अशी मिळून एकूण संख्या २०४ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे.

तसेच कोरोना बाधितांच्या संख्येसोबतच महाराष्ट्रातील मृत्यूदरही वाढला आहे. राज्यातील मृत्यूदर सहा टक्क्यांवर आला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामतीत तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत.

राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या

  • मुंबई – ८५७
  • पुणे मनपा – १६८
  • पिंप्री चिंचवड मनपा – १९
  • पुणे ग्रामीण – ६
  • ठाणे मनपा- २५
  • कल्याण डोंबिवली मनपा – ३०
  • नवी मुंबई मनपा – ३१
  • मीरा भाईंदर – ४
  • वसई विरार मनपा – ११
  • पनवेल मनपा – ६
  • ठाणे ग्रामीण – ३
  • पालघर ग्रामीण – ३
  • रत्नागिरी – ३
  • सिंधुदुर्ग – १
  • यवतमाळ – ४
  • सातारा – ६
  • सांगली – २६
  • नागपूर मनपा – १९
  • अहमदनगर मनपा – १६
  • बुलढाणा – ८
  • अहमदनगर ग्रामीण – ९
  • औरंगाबाद मनपा – १५
  • लातूर मनपा – ८
  • उस्मानाबाद – ४
  • कोल्हापूर मनपा – २
  • उल्हासनगर मनपा – १
  • नाशिक मनपा – १
  • नाशिक ग्रामीण – १
  • जळगाव ग्रामीण – १
  • जळगाव मनपा – १
  • औरंगाबाद ग्रामीण – १
  • जालना – १
  • हिंगोली – १
  • वाशीम – १
  • अमरावती मनपा – १
  • गोंदिया – १
  • अकोला – १
एकूण – १२९७
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या वर्षी परीक्षा होणारच”, वर्षा गायकवाडांनी ठणकावून सांगितले

News Desk

संजय राऊत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गळाभेटीचे कारण काय…?

News Desk

उद्धव ठाकरे उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk