HW News Marathi
Covid-19

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजारांच्या पार

पुणे | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्या ३३ हजार पार झाली आहे. तर राज्यातील मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णा आहे. पुण्यात काल (१७ मे) २२३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या ४ हजार १८ वर पोहोचली आहे. तर काल जिल्ह्यात ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात ६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २, ०१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. राज्यात काल एका दिवसात २ हजार ३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. राज्यातील दिवसेंदिवस वाढ्यात कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल ३१ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. तर राज्यात काल ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे ११ रुग्णांचा झाला मृत्यू, आणखी रुग्णांचा जीव टांगणीला

News Desk

देशात एकाच दिवसात ६४ हजारांहून नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

#Coronavirus : देशात कोरोनाबाधीतांचा आकडा ३७ हजारांच्या पुढे

News Desk