HW News Marathi
Covid-19

जगभरात आतापर्यंत ४८ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, तर १८ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

मुंबई | जगभरात कोरोनाचा थैमान घातला आहे. गेल्या २४ तासांत ८२ हजार २४७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ३ हजार ६१७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत ४८ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ३ लाख १६ हजार लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे, अशी माहिती वर्ल्डोमीटरने दिली आहे. तसेच १८ लाख ५६ हजार १८८ लोक कोरोनामुक्त झाले आहे.

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १,५२७,६५४ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ९० हजार ९७८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर युरोपात सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीमध्ये एका दिवसात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होत चालली आहे. आज (१८ मे) इटलीत लॉकडाऊन थोडा शिथिल करण्यात आला.

दरम्यान, ब्रिटनमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. काल (१७ मे) ब्रिटनमध्ये १७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये आतापर्यंत २४ लाख ४९ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर ३४ हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. स्पेनमध्ये काल कोरोनामुळे ८७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यात स्पेनमध्ये एका दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे हे सगळ्यात कमी प्रमाण आहे. फ्रान्समध्ये काल ४,०८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी अनेकांचा मृत्यू ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या केयर होम्समध्ये झाला. फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २८ हजार १११ जणांचा मृत्यू झाला आहे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलढाणा जिल्ह्यात ७-२१ जुलै लॉकडाऊन जारी

News Desk

अमरावतीत आरोग्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा भाजपने रोकला

News Desk

शिवसेना नगरसेविका काळाच्या पडद्याआड, रणरागिणी सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

News Desk