HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : पुण्यात ८७६ लोकांना क्वारंटाईन, तर ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या १५ वर

पुणे | कोरोनाग्रस्तांची देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२२ मार्च) देशभरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. जनता कर्फ्यूदरम्यान देशभरातून मिळालेल्या उत्तम प्रतिबद्दल मोदींनी ट्वीट करत देशवासियांचे आभार मानले. सध्या देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३२४ वर गेला आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १५ वर, पिंपरी-चिंचवड १२ असे एकूण २७ रुग्ण एकट्या पुण्यात आहे. तर पुण्यात ८७६ लोकांना क्वारंटाईन केल्याची माहिती पुण्याच्या आरोग्य विभागने दिली आहे. तसेच महाराष्ट्रात गेल्या २४ तासात नव्या १० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी राज्यात ६ मुंबई आणि पुण्यात ४ रुग्ण आहेत.

दरम्यान, पुण्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यात आज (२२ मार्च) दिवसभरात ४६६ रुग्णांचे सॅम्पल गोळा करण्यात आले. यातील १९ जणांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. तर ४३२ जणांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. पुण्यात एक कोरोनाग्रस्तची प्रकृती गंभीर आहे. व्यतिरिक्त पुण्यात एकूण १ हजार ६३७ प्रवासी बाहेरुन दाखल झाले आहेत. त्यातील ८७६ लोकांना क्वारंटाईन केले, अशी माहिती पुण्याच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – १२
  • पुणे – १५
  • मुंबई – २५
  • नागपूर – ४
  • यवतमाळ – ४
  • कल्याण – ४
  • नवी मुंबई – ३
  • अहमदनगर – २
  • पनवेल – १
  • ठाणे – १
  • औरंगाबाद – १
  • रत्नागिरी – १
  • उल्हासनगर – १

एकूण – ७४ कोरोनाग्रस्तांची संख्या

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार ममता बॅनर्जी भेटीवर महाविकास आघाडीतील मंत्री म्हणतात….

News Desk

ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच !

News Desk

पुरामुळे औरंगाबादमध्ये मोठं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची खासदार जलील यांची मागणी!

News Desk