HW News Marathi
महाराष्ट्र

देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा घट, सक्रिया रुग्णसंख्याही खाली!

नवी दिल्ली। देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 1 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 27 हजार 254 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर काल 219 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

आतापर्यंत रुग्णांची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 32 लाख 64 हजार 175 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 47 हजार 32 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 42 हजार 874 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 74 हजार 269 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 74 कोटी 38 लाख 37 हजार 643 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केरळात किती कोरोनाग्रस्त?

27 हजार 254 नवीन कोरोनाग्रस्तांपैकी एकट्या केरळमध्ये काल 20 हजार 240 रुग्ण सापडले, तर 219 कोरोना बळींपैकी केरळात 67 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महापुरुषांना जातीवरून वाटू नका”, पंकजा मुंडेंनी वादग्रस्त वक्तव्या करणाऱ्यांना खडेबोल सुनावले

Aprna

पूरग्रस्तांना मदत की फक्त जाहीरातबाजी ?

News Desk

विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उद्या होणार निवडणूक

News Desk