मुंबई । पालघरमध्ये मॉब लिंचिंगची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरमधील गडचिंचले गावात घडली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका करते केली आहे. पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करू दिली आहे.
पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 19, 2020
मुख्यमंत्री ट्वीट मध्ये म्हटले की, “पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल.”
मुंबईहून सूरतला निघालेल्या तीघांची पालघर येथील हत्येची
राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील १०१ जणांची अटक केली गेली आहे व उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कुणीही या घटनेचे विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून दिली आहे.
मुंबईहून सूरतला निघालेल्या तीघांची पालघर येथील हत्येची
राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील १०१ जणांची अटक केली गेली आहे व उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कुणीही या घटनेचं विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे.#LawAndOrderAboveAll— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 19, 2020
पालघर प्रकरणावरून विरोधकांनी या घटनेची नैतिक जवाबदारी स्विकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण
पालघरमध्ये मॉब लिंचिंगची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरमधील गडचिंचले गावात घडली आहे.
शेकडो ग्रामस्थांनी हल्ला केला पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक गावकऱ्यांनी चोर समजून या तिघांची गाडी थांबविली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि जेव्हा त्यांची गाडी थांबली तेव्हा तिघांना बाहेर काढून गावकऱ्यांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.