HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

‘त्या’ सुसाईड नोटमध्ये नामोल्लेख असलेल्या लोकांचा राष्ट्रवादीशी काडीमात्र संबंध नाही !

मुंबई । बारामतीतील व्यापाऱ्याने आत्महत्या करताना लिहिलेल्या नोटमध्ये नामोल्लेख असलेल्या लोकांचा राष्ट्रवादीशी काडीमात्र संबंध नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.

बारामतीतील व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर भाजपकडून आत्महत्या प्रकरणात आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा आरोप केला होता त्याला महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले शिवाय त्या लोकांचा राष्ट्रवादीशी संबंध नाही हेही स्पष्ट केले आहे.

जयसिंह देशमुख हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. तो राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आलेला नगरसेवक आहे. उर्वरित नावे आहेत त्यात संघर्ष गव्हाले हा भाजपाचे स्थानिक नेते विजय गव्हाले यांचा मुलगा आहे त्यामुळे यांचा राष्ट्रवादीशी संबंध जोडू नये आणि राष्ट्रवादीची बदनामी करु नये असेही महेश तपासे यांनी भाजपाला ठणकावून सांगितले आहे.

अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा खोटा धंदा ताबडतोब बंद करावा. कारण नसताना बेजबाबदारपणे राष्ट्रवादीची बदनामी करु नये असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.

Related posts

महानायक अमिताभ बच्चन कोरोनाला हरवून सुखरूप घरी परतले !

News Desk

आम्ही आजपर्यंत कधीही पवारसाहेबांना इतके चिडलेले पाहिले नव्हते !

News Desk

चंद्रकां(ता) की कहानी ये माना है पुरानी, अमोल मिटकरी यांचा पाटलांवर अप्रत्यक्ष निशाणा

News Desk