HW News Marathi
महाराष्ट्र

फाळणीची वेदना कधीही विसरणे शक्य नाही म्हणत पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा!

नवी दिल्ली। भारताच्या फाळणीचा दिवस म्हणजे 14 ऑगस्ट. याच दिवशी 1947 साली भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या नव्या देशाची निर्मिती झाली. भारताच्या फाळणीचा इतिहास रक्तरंजित आहे. या फाळणीमध्ये हजारो लोकं मारली गेली, तसंच लाखो जणांना आपलं घर-दार सोडून अंगावरच्या कपड्यासह विस्थापित व्हावं लागलं. फाळणीच्या या कटू आठवणीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच भावुक झाले आहेत.

स्मृती दिवस’ म्हणून पाळला जाईल

पंतप्रधानांनी ट्विट करत 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या वेदनांचं स्मरण करण्यासाठी ‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा केली आहे. या कृतीमुळे देशातील भेदभावाचे विष कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

देशाच्या फाळणीची वेदना विसरणे अशक्य

पंतप्रधान मोदींनी म्हंटले आहे की, ‘देशाच्या फाळणीची वेदना विसरणे अशक्य आहे. द्वेष आणि हिंसा या कारणामुळे आपल्या लाखो भावंडांना विस्थापित व्हावं लागलं. अनेकांनी जीव गमावला. त्यांचा संघर्ष आणि आठवण म्हणून 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभाषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य, आणि दुर्भावना याचे विष संपवण्यासाठी प्रेरणा देईल. त्याचबरोबर एकता, सामजिक सलोखा आणि मानवी संवेदना देखील यामुळे मजबूत होईल.’

इतिहासातील सर्वात मोठे विस्थापन

ब्रिटीशांनी 1947साली भारत सोडताना देशाची फाळणी केली. मुस्लीम बहुल पाकिस्तान या नव्या देशाची निर्मिती त्यांनी केली. त्यानंतर इतिहासातील सर्वात मोठे विस्थापन झाले. त्या घटनेच्या वेदना आजही जिवंत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात कृषी विधेयकावरून शेतकऱ्यांचे आंदोलन!

News Desk

दिवाळी आधी मदत मिळणार, सरकार शेतकऱ्यांसोबत असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही – बच्चू कडू

News Desk

कोरोनावर आजवर केलेली मेहनत फटाक्यांमुळे वाया घालवू नका, मुख्यमंत्र्यांचे दिवाळीनिमित्त आवाहन

News Desk