HW News Marathi
महाराष्ट्र

या तीन नेत्यांच्या घरासमोर आज होणार ठिय्या आंदोलन

पुणे | गेल्या आठवडाभरापासून मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. ५८ मुक मोर्चे काढल्यानंतर मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे शांतपणे सुरु असलेल्या मोर्चाचे रुपांतर ठिय्या आंदोलनामध्ये झालेले पहायला मिळत आहे.आज पुण्यातील तीन लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामाची आठवण करुन देण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी केला आहे.

आज गुरुवारी २ ऑगस्ट रोजी पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण आणि मंत्री दिलीप कांबळे यांच्या घराबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक ठिय्या आंदोलन करणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाकडून यासंदर्भात वेळा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. आरक्षणासह आपल्या इतर मागण्यांसाठी मराठा समाज सध्या राज्यात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. आता लोकप्रतिनिधींना मराठ्यांच्या या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे पहायला मिळत आहे. नेहमी राजकारणात पोकळ आश्वासने देणा-या नेत्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच वेठीस धरले आहे हे मात्र निश्चित.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

Sanjay Jog

विरोधी पक्षात बसून ‘मळमळ’ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती !

News Desk

भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा सुरुंग, १० नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन!

News Desk