HW News Marathi
Covid-19

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार !

मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत तिसऱ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात १४ हून अधिक जिल्हे हे रेडझोन आहेत. मात्र, राज्यातील रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळून ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील लॉकडाऊन शिथील केला आहे. जेणे करून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. कोरोनानंतरही लोकांना काळजी घ्यावी लागणार आहेच. येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्राचे गणेशोत्सवाशी वेगळे नाते आहे. मात्र, यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे घेतला आहे, असे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले आहे.

गणेशोत्सवादरम्यान, मुंबई आणि पुण्यात दिवसरात्र मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, कोरोना रोखण्यासाठी गणेशोत्सवामध्ये सोशल डिस्टन्टिंग योग्य पाल होईल का?, आता यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर मुंबईकरांना वेद लागतात ते ऑगस्ट महिन्यात बाप्पाच्या आगमनाचे मात्र यावेळी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळाच्या भल्या मोठ्या गणेश मूर्ती , आकर्षक देखावे, मिरवणुकीचा जल्लोष हे मुंबईच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. कोरोनाचे संकट पाहता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे घेतला आहे, असे अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतापजनक! कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब …

News Desk

१ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांचे कोरोना लसीकरण होणार? राजेश टोपे म्हणतात…

News Desk

मृत्यूचं थैमान! देशात कोरोनाबळींचा नकोसा नवा उच्चांक तर बाधितांच्या संख्येत घट

News Desk