HW News Marathi
Covid-19

संतापजनक! कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब …

अमरावती | कोरोनाच्या काळात महिलावंरील अत्याचारांच्या घटना कमी होताना दिसत नाहीयेत.क्वारंटाईम सेंटरमध्ये घडलेली बलात्काराची घटना ताजी असताना अमरावती जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे घडली आहे. या प्रकरणी बडनेरा पोलिसांकडून एका लॅब टेक्निशियनला अटक करण्यात आली आहे.

https://www.facebook.com/401858593580943/posts/1006666303100166/?vh=e&d=n

या अशा प्रकारणामुळे सध्या अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी मंगळवारी रात्री आरोपीला अटक केली. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या घटनेची चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल असे सांगितले आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, लॅब टेक्निशियनने २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतला. या प्रकाराची माहिती तरुणीने आपल्या भावाला सांगितली. त्यांनी याबाबत डॉक्टरांकडे विचारपूस केल्यानंतर अशाप्रकारे चाचणी करत नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ५७,९८२ नवे कोरोना रुग्ण तर ९४१ रुग्णांचा झाला मृत्यू

swarit

ही वेळ सरकार आणि विरोधी पक्ष यांनी हातात हात घालून महाराष्ट्राची सेवा करण्याची आहे

News Desk

राज्यात १ सप्टेंबरनंतर काय? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले

News Desk