मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असा संदेश देश केंद्र आणि राज्य सरकार जनतेला दिला आहे. तसेच कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रातील शुटिंग थांबविण्यात आली आहे. यामुळे आता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लोकप्रिय मालिकांचे पुन:प्रक्षेपण सुरू केले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा इतिहास उलगडणार स्टार प्रवाहवरील राजा शिवछत्रपती आणि कोरोनासारख्या संकट काळात नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आणारी आंबटगोड या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
याआधीच रामायण आणि महाभारत हे दुरदर्शनवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार्यक्रम प्रसारित होत आहे. यामुळे घरातील लहान मुलांवर संस्कार होण्याच्या दृष्टीने या मालिकांकडे पाहिले जाते. या दोन्ही मालिका सद्या दुरदर्शनवर प्रसारित होत आहे. यापाठोपाठ लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवरील राजा शिवछत्रपती आणि आंबटगोड या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या शुक्रवारी (३ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता आंबटगोड आणि ५.३० वाजता राजा शिवछत्रपती या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
स्टार प्रवाहवरील राजा शिवछत्रपती ही मालिका प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केले आहे. तर अजय अतुल यांनी संगीतबद्द केलेले मालिकेचे शीर्षकगीत प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामनात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज भूमिका साकारली आहे. तर आंबटगोड मालिकेतून विध्वंस वाड्याची धमाल आणि राया अबोलीचे आंबटगोड नाते पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.