HW News Marathi
महाराष्ट्र

देशात ओमायक्रॉनचा दुसरा बळी; कोणतीही विदेशवारी न करता महिलेने गमावला जीव

मुंबई | कोविड-१९ चा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनने पाहता पाहता संपूर्ण देशात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अशात आता या व्हेरियंटने लोकांचा बळी घेण्यासही सुरुवात केली असून देशात ओमायक्रॉनचा दुसरा मृत्यू झाला आहे. ओडिशातील बोलंगीर जिल्ह्यात ओमायक्रॉनने संक्रमित झालेल्या एका ५५ वर्षीय महिलेला ओमायक्रॉनमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या महिन्यात संबंधित महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. याआधी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका वृद्धाचा ओमायक्रॉनच्या संसर्गाने मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी (६ जानेवारी) देशात दुसऱ्या ओमायक्रॉन मृत्यूची नोंद झाली आहे.

तिसरी लाट सुरू झाल्यासंदर्भात सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी आकडेवारीवरून तिसऱ्या लाटेचे चित्र पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाबाधितांसह ओमायक्रॉन रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशातील कोरोना रुग्णसंख्येने १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर देशातील ओमायक्रॉनबाधितांची आकडेवारीही चिंताजनक असून ओमायक्रॉनचा दुसरा बळी गेला आहे. २७ डिसेंबर रोजी संबलपूर जिल्ह्यातील वीर सुरेंद्र साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेमध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता. परंतु, आता आलेल्या माहितीनुसार, त्या महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली होती, असे स्पष्ट झाले आहे.

दोन्ही रुग्णांणी विदेशवारी केलेली नव्हती

ओडिशातील बोलंगीर जिल्ह्याच्या अगलपूर गावात राहणाऱ्या या महिलेने कोणतीही विदेशवारी केली नव्हती. मात्र, गेल्या महिन्यात या महिलेला स्ट्रोक झाला होता. त्यानंतर २० डिसेंबर रोजी तिला बालांगीरच्या भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान तिची प्रकृती खालवल्याने कोरोना चाचणीसाठी तिचा सॅम्पल घेण्यात आला. तिच्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालानुसार त्या महिलेला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले, बालंगीर जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, याआधी राजस्थानच्या उदयपूरमधील एका ७३ वर्षांच्या वृद्धाचा ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाला होता. या रुग्णाने देखील परदेशात प्रवास केलेला नव्हता.

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण

दरम्यान, ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. देशातील पॉझिटिव्हीटी रेट हा ७.७४ टक्के इतका झाला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक वेगाने होत असून ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येने आता तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यासह आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे ३,००७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असून ही संख्या आता ८७६ वर पोहोचली आहे. त्यानंतर दिल्लीत ४६५ रुग्ण आढळले आहेत, तर राजस्थानमध्ये २९१, केरळमध्ये २८४ आणि गुजरातमध्ये २०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचं दिसत आहे- देवेंद्र फडणवीस

News Desk

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट होणार?

swarit

पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna