HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना १५ दिवसात लोकसभा, तर दोन महिन्यात विधानसभा उमेदवार जाहीर करणार

मुंबई : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात उत्कृष्ट उमेदवाऱ्यांचा शोध शिवसेना घेत आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरत आहे. पुढच्या पंधरा दिवसात लोकसभा उमेदवार, तर दोन महिन्यात विधानसभा उमेदवार निश्चित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढच्या महिन्याभरात पूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत. नाशकात रविवारी उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, रवींद्र मिर्लेकर आणि स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पाच लोकसभा आणि ३६ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.

तर पश्चिम महाराष्ट्राच्या ८ लोकसभा आणि ४८ विधानसभा उत्कृष्ट उमेदवारांसाठी पुढच्या आठवड्यात पुण्यात बैठक होणार आहे, तर ठाणे-कोकणच्या पाच लोकसभा आणि ३० विधानसभा मतदारसंघाच्या उत्कृष्ट उमेदवारांसाठी ठाण्यात बैठक होणार आहे.

उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अरविंद नेरकर यांच्यासह स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विदर्भातील ११ लोकसभा आणि ८४ विधानसभा मतदारसंघांसाठी उत्कृष्ट उमेदवार केली जाणार आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भाची आढावा बैठक नागपूरमध्ये रवीभवनात ११ मे रोजी घेण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार”

News Desk

सक्तीच्या वीज बिल वसुलीच्या विरोधात राजू शेट्टींचा आंदोलनाचा इशारा

News Desk

मोतीलाल व्होरा यांच्या निधनाने अत्यंत निष्ठावान व अनुभवी नेतृत्व हरपले ! | बाळासाहेब थोरात

News Desk