HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ पुन्हा वाढणार, ‘हा’ आमदार करणार राष्ट्रवादीत एन्ट्री!

मुंबई | सध्या सगळे राजकीय पक्ष स्वतः ला सक्षम करत असून आपलं बळ वाढवताना दिसत आहेत. अशात पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. मात्र, आता एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून राष्ट्रवादीचं संख्याबळ पुन्हा वाढलं आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघाचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: माध्यमांना दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढणार असल्याचं दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची काम करण्याची पध्दत आपल्याला आवडते. तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी ते आपल्याला मदत देखील करतील म्हणूनच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती श्यामसुंदर शिंदे यांनी दिली आहे. आमदार शिंदे यांच्या निवासस्थानी जलसंपदामंत्री जयंत पाटील हे चहापानासाठी आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. ते जरी शेतकरी कामगार पक्षातून निवडून आले असले तरीही त्यांनी आपला पाठिंबा हा भाजपला जाहीर केला होता. मात्र, फडणवीसांचं 72 तासांचं सरकार जाताच श्यामसुंदर शिंदे यांनी यू-टर्न घेत महाविकास आघाडीला आपला पाठिंबा असल्याचं तेव्हा म्हटलं होतं.

दरम्यान, असं असलं तरी ते शेकापमध्येच होते. मात्र, आता शेकापला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्या सत्तेत असणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्या मतदारासंघाची विकासकामं वेगाने व्हावीत यासाठी आपण राष्ट्रवादीत जात असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावरकरांचा पुळका असल्याचं दाखवणारे त्यांना भारतरत्न का देत नाहीत? संजय राऊतांचा विरोधकांना सवाल

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोलापूर दौऱ्याला सुरुवात

News Desk

‘राष्ट्रवादी’ला विश्‍वासात घेऊन निर्णय घ्या, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला!

News Desk