HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांच्या राजीनाम्यांसाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांचे आंदोलन

मुंबई | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकासआघाडी सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भाजपच्या नेत्यांनी हतात फलक घेऊन विधीमंडळाच्या पाऱ्यांवर मलिकांविरोधात आंदोलन केले. 

दरम्यान, भाजपने हातात घेतलेल्या फलकावर ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहेत का??, असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. तर ‘ ‘दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, आशा घोषाबाजी करत भाजपने नवाब मलिक आणि महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. या आंदोलनात विधासभा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपेचे नेते गोपीचंद पडळकर, भाजपचे आमदार अतुल भातकळकर, भाजपचे नेते आशिष शेलार आदी नेते आंदोलनात सहभागी झाले. 

मविआ सरकार हे इतिहासातील भ्रष्टाचारी सरकार – फडणवीस

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापान्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, विरोधकांनी सरकाच्या चहापान्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची माहिती राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (२ मार्च) पत्रकार परिषदेत दिली यावेळी फडवीसांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, “महाविकासआघाडी सरकार हे इतिहासातील भ्रष्टाचारी सरकार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच्या अधिवेशनात म्हटले होते की, तकऱ्यांचे वीज मीटर कापले जाणार नाहीत, असा शब्द दिला होता. परंतु, मीटर कापावे लागतील असे ते शेवटच्या दिवशी म्हणाले.यामुळे आता अजित पवारांच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही. ठाकरे सरकार हे सावकारी सरकार आहे, असे ते म्हणाले.

Related posts

शिंदेंच्या बंडात मदत करणाऱ्या ‘या’ नेत्यांच्या पदरी ‘मंत्रिपद’ पडणार?

Manasi Devkar

पंतप्रधान संवेदनशील, पण मी विरोधी पक्षनेत्यासारखं वैफल्यग्रस्त नाही, मुख्यमंत्र्याचा फडणवीसांवर पलटवार

News Desk

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून १४.८२ कोटी थकबाकी वसूल करण्यात मुंबई पोलीस अपयशी

Aprna