HW News Marathi
Covid-19

चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे, मुख्यमंत्र्यांनी दिला विश्वास

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ वर गेली आहे. देशासह राज्यात लॉकडाऊनचा चौथ्या टप्पा सुरू आहे. लॉकडाऊमुळे बहुतांशी उद्योग बंद आहे. तसेच मनोरंजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज (२० मे) कोरोनामुळे येणाऱ्या समस्यांच्या अनुषंगाने मराठी चित्रपट निर्माते, नाट्य व मालिका निर्माते, कलाकार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सर्वांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रयत्नांत आमची साथ राहील याची ग्वाही दिली. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.

महाराष्ट्रातले करमणूक आणि मनोरंजन क्षेत्र मोठे आहे. यावर रोजीरोटी कमावणारे लहान मोठे कलाकार तर आहेतच शिवाय तंत्रज्ञ, बॅक स्टेज कलाकार, कामगार हा वर्गही मोठा आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी चित्रपटनगरीतील सध्या ज्यांचे सेट्स उभे आहेत त्यांना भाडे सवलत, लोककला, तमाशा कलावंत यांना जगविणे यासंदर्भात निश्चितपणे विचार केला जाईल असे सांगितले.

. ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये दक्षता घेऊन व सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना, चित्रीकरण सुरु करता येईल का याचा विचार करता येईल पण त्यासाठी कंटेनमेंट झोन्समध्ये चित्रीकरण स्थळे नाहीत ना, तसेच चित्रीकरण पथकातील लोकांची संख्या, त्यांचे राहणे-जेवणे या गोष्टीदेखील पाहाव्या लागतील. मनोरंजन क्षेत्र हे केवळ करमणूक करणारे नाही तर लोक त्यांचे अनुकरण करतात, त्यांच्यापासून शिकतात त्यामुळे या क्षेत्राचे महत्व आहे. नाट्य आणि चित्रपटगृहे ही सार्वजनिकरीत्या एकत्र येण्याची ठिकाणे असल्याने तिथे लगेच परवानगी देता येईल असे वाटत नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन सुबोध भावे, आदेश बांदेकर यांनी केले. तर खासदार डॉ अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसाद कांबळी, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील फडतरे, केदार शिंदे अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे, आदींनी सूचना केल्या तसेच आपल्या समस्या मांडल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताने इटलीला टाकले मागे

News Desk

देशात २४ तासांत ४९,३१० रुग्ण आढळले, तर ७४० जणांचा झाला मृत्यू

News Desk

कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत आता सातव्या क्रमांकावर

News Desk