HW News Marathi
Covid-19

अदार पुनावाला हे पुण्याचे, महाराष्ट्राला झुकतं माप द्यावे !

मुंबई । राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्याकडे एक मागणी केली आहे. “आदर पुनावाला हे पुण्याचे आहेत. त्यामुळे लसींबाबत पुनावाला यांनी महाराष्ट्राला झुकत माप द्यावे. महाराष्ट्र लसीकरणाची किंमत मोजण्यास तयार आहे”, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे म्हणाले की, “पुनावाला म्हणाले की जुलै आॅगस्टमध्ये लस उपलब्ध होईल. मात्र, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करायचे आहे. पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे लस कंपन्यांनी आम्हाला अधिक लस उपलब्ध करुन द्यावी, अशी आम्ही विनंती करत आहोत,”असे राजेश टोपे म्हणाले.

केंद्र सरकार लाॅकडाऊनबाबत जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल !

राजेश टोपे पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या आरोग्य सल्लागारांनी भारतात लाॅकडाऊन लावावा लागेल असे म्हटले आहे. मात्र, आता केंद्र सरकार सध्या देशातील वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनबाबत जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल”, असे म्हणत राजेश टोपेंनी यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

विदर्भात कोरोनाचा म्युटेट झालेला डिफ्रंट व्हेरियस आढळून आला आहे. त्यासाठी जिनोमिक्स सिक्वेन्सिंगला महत्व देऊन त्यावर राज्य सरकार खर्च करणार आहे. जिनोमिक्स सिक्वेन्सिंग करून घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण असून राज्य शासन त्यात विशेष लक्ष घालणार असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्या आजच्या भेटीमागचे खरे कारण

News Desk

मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk

राज्य सरकारकडून वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता 

News Desk