HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकार स्थिर, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या पाठिंशी उभे !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (२५ मे) राज्यपाल भगतसिंग कोश्यार याची भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीला जावून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही भेटनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. राज्यातील ठाकरे सरकार स्थिर आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या पाठिंशी मजबूत उभे आहे, असे शरद पवार एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले,

शरद पवार म्हणाले, “राज्यातील ठाकरे सरकार स्थिर आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या पाठिंशी मजबूत उभे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. तिन्ही पक्षाची एकच भूमिक आहे. कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढायचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांना राज्यपाल भेटीसंदर्भात म्हणाले, “राज्यपालांची भेट घेतली यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यांनी दोन वेळा चहाचे निमंत्रण दिले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहण्यास आपण कटिबद्ध आहोत.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३०० हून अधिक कोरोनाग्रस्त महिलांच्या प्रसुती, नायर रुग्णालयाने दिलेले योगदान अतुलनीय !

News Desk

जाणून घ्या…यंदाचे शैक्षणिक वर्ष असे असणार

News Desk

राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू

News Desk