HW News Marathi
Covid-19

Unlock 1.0: आजपासून देशात १० टक्के कर्मचारी क्षमतेने खासगी कार्यालये सुरु

मुंबई | कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. देशात लॉकडाऊन ५ मध्ये टप्प्याटप्प्याने सर्व अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशात १ जूनपासून अनलॉक १ सुरु झाला आहे, तर कन्मेंन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. देशात अनलोकचा आज (८ जून) तिसरा टप्पा सुरू होणार आहे. यात खासगी कार्यलयात १० टक्के मनुष्यबळासह सुरु होत आहेत. तर अन्य कर्मचाऱ्यांना घरूनचा काम करावे लागणार आहे.

तसेच नागरिकांसाठी मुंबईत बेस्ट सुविधा सुरु होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील मंडई आजपासून सुरु होणार आहेत. परंतु राज्यात धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडण्यास अद्याप परवानगी नाही. कंटेन्मेंट झोन वगळता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या सवलती तिसऱ्या टप्प्यात कायम राहतील.

अनलॉक टप्पा 3 (८जून पासून सुरु होईल)

  • सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के मनुष्यबळासह सुरु करता येतील. इतर कर्मचारी घरी राहून काम करतील. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर यांचे नियम पाळावे लागतील. घरी परतल्यानंतर घरातील वयस्कर व्यक्तींना कोणताही संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. या अनुषंगाने संबंधित आस्थापनांनी योग्य त्या सूचना/निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना द्यावे लागतील.
  • जी कामे करण्यासाठी बंदी नाही ती सुरु ठेवता येतील. परवानगी असलेल्या कामांसाठी कोणत्याही शासकीय परवानगीची गरज असणार नाही. स्टेडियम आणि खुली क्रीडा संकुले ही व्यक्तिगत कवायती, व्यायामासाठी वापरात येतील. मात्र या ठिकाणी प्रेक्षक वा दर्शकांच्या सहभागावर पूर्णपणे बंदी राहील. इनडोअर स्टेडियममध्ये कोणत्याही बाबीस परवानगी दिली जाणार नाही. सर्व शारीरिक कवायती आणि व्यायाम सामाजिक अंतराचे नियम पाळून करणे आवश्यक राहील.
  • सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे राहील- दुचाकी एक प्रवासी, तीन चाकी किंवा ऑटो रिक्शा – 1 अधिक 2 प्रवासी, चार चाकी वाहन – 1 अधिक 2 प्रवासी.
  • जिल्ह्यांतर्गत बस वाहतुकीला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह अनुमती असेल. तसेच यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे तसेच स्वच्छताविषयक काळजी घ्यावी लागेल.
  • आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) बस वाहतुकीला अनुमती नसेल. यासंदर्भातील आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील.
  • सर्व दुकाने, मार्केटस् हे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहतील. गर्दी दिसल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाकडून सदरची दुकाने किंवा मार्केट तातडीने बंद करण्यात येतील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाशी लढण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा ..

Arati More

विधानपरिषदेची निवड बिनविरोधी, तर भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

News Desk

राज्यात आज १८,०५६ नवे रुग्ण आढळले

News Desk