HW News Marathi
Covid-19

जगात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ७० लाखांच्या पुढे

मुंबई | जगभरात कोरोनाचा कहर आता शिगेला पोहोचला आहे. सध्या जगात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढून ७० लाखांच्या पुढे गेला आहे. तसेच या महामारीच्या विळख्यात अडकून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४ लाखांहून अधिक झाली आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील २१३ देशांमध्ये सोमवारी सकाळपर्यंत एकूण 70 लाख ८१ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ४ लाख ५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३४ लाख ५५ हजार ०९९ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझील, रुस, स्पेन, इटली आणि भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. अमेरिकेसह या १५ देशांमध्ये एकूण ५४.६२ लाख रुग्ण आहेत. ५ देश (अमेरिका, इटली, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील) ज्यांमध्ये ३० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा १.१२ लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-१७ कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा समावेश टॉप-६ कोरोना बाधित देशांच्या यादीत झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk

कुटुंबांच संरक्षण करणं ही प्रत्येक पुरुषांची नैतिक जबाबदारी…

News Desk

राज्यात आज ८२४० नवे रुग्ण आढळेल, तर ५४६० रुग्ण झाले कोरोनामुक्त

News Desk