HW News Marathi
महाराष्ट्र

“आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, मात्र पवारांनी विश्वास ठेवला” – धनंजय मुंडे

पुणे। “इथे तीन असे सूर्य आहेत ज्या सूर्यांना ग्रहण लागलं होतं. पहिला मी, दुसरे आमदार निलेश लंके आणि तिसरे मावळचे आमदार सुरेश शेळके. आम्ही आज जे आहोत ते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमच्यासारख्या तरुणांवर विश्वास ठेवला म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर आहोत. नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं जे कधी निघालंच नसतं. ते अजितदादांनी काढलं. ही खरी गोष्ट आहे”, असं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे पुण्यात म्हणाले. मावळमध्ये विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

यासारखं वाढदिवसाचं कुठलंच गिफ्ट असूच शकत नाही

पुढे बोलताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले अजित पवार यांना मी सांगणार आहे. आमदार निलेश लंके तर बोलले. दादा आमच्याही वाढदिवसाला हजेरी लावली… तसं तुमच्या आशीर्वादाने काही कमी नाही. मला याची जाणीव आहे. ही खरी गोष्टी आहे की सुनील अण्णा आणि मी एका पक्षात काम करतो. अण्णा तो इतिहास आहे. तुम्ही-आम्ही एकत्र आहे ते भविष्यात”, असं देखील धनंजय मुंडे म्हणाले.रोज सूर्य उगवतो आणि मावळतो. पहिल्यांदा मावळामध्ये सूर्य उगवल्यानंतर मावळणार नाही, याची जाणीव होतेय. सुनील शेळकेंनी मला मोठं भाऊ केलंय. तर अजितदादांनी सामाजिक न्यायमंत्री केलंय. वडगाव मावळमध्ये 20 तारखेला सुनील अण्णांच्या तारखेला अजितदादांनी वेळ देणं हे साधंसोपं काम नाही. वाढदिवसाला वेळ देण्यापेक्षा या वडगाव मावळवर आणि सुनील अण्णांवर अजितदादा आणि पवारसाहेबांचं एवढं प्रेम आहे की, दोन वर्षात कितीही आर्थिक संकटं आली तरी वळगाव मावळमध्ये 756 कोटी रुपये विकासकामांसाठी दिले. यासारखं वाढदिवसाचं कुठलंच गिफ्ट असूच शकत नाही”, असं मत धनंजय मुंडेंनी मांडलं.

पडेल उमेदवाराला शरद पवार आणि अजित पवारांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी बसवलं

पक्ष एक कुटुंब आहे. शरद पवार हे या कुटुंबाचे प्रमुख आहे, असंदेखील यावेळी मुंडे म्हणाले. यावेळी मुंडेंनी निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाचा किस्सा सांगितला. “आम्ही हल्लाबोलच्या यात्रेत पारनेरला होतो. अजित पवार येणार निश्चित झालं होतं. निलेश लंके यांचा प्रवेश त्या कार्यक्रमात झाला होता. अजित पवार यांना कब्बडीच्या स्पर्धेच्या कार्यक्रमानिमित्ताने रायगडला जावं लागलं होतं. अजित पवार येणार नाहीत हे निलेश लंकेंना कळालं. पुणे-नगरच्या फाट्यापासूनच लंके पारनेरला यायला तयार नव्हते. अजित पवार असतील तर माझा प्रवेश, नाहीतर काही खरं नाही. आम्ही म्हणालो, आम्ही सगळे आहोत. तर ते म्हणाले, तुमचा उपयोग नाही. शेवटी कसंतरी अजित पवारांशी फोनवर बोलणं करुन दिलं. समाधान झालं. आणि आज लंके आमदार आहेत. मी तर 2014 ला पडलो. पडेल उमेदवाराला शरद पवार आणि अजित पवारांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी बसवलं. हे दुसरीकडे कुठं होत नाही. हे फक्त इथेच होतं आणि ते हेच करु शकतात”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना ४१ कोटींची मदत;- पालकमंत्री छगन भुजबळ

News Desk

पुढील २५ वर्ष भाजपचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही, तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खोदली, राऊतांची भविष्यवाणी

Aprna

“जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा!

News Desk