HW News Marathi
महाराष्ट्र

‘बेस्ट’ला आर्थिक बळकटी देण्यासाठी तिकीट स्वस्त

मुंबई | बेस्ट प्रशासनाला आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यासाठी ६०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा नवा प्रस्तावाला महापालिकेच्या सभेत सोमवारी (२४ जून) अंतिम मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आज महापालिकेच्या बेस्ट समितीने किमान भाडे ५ रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बेस्ट बसचे किमान भाडे आठ रुपयावरुन पाच रुपये केले आहे. प्रवाशांकडून पहिल्या टप्प्यातील ५ किमी अंतरापर्यंत केवळ ५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

बस भाडे (बिगर वातानुकूलित)

५ किलोमीटर ५ रुपये

१० किलोमीटर १० रुपये

१५ किलोमीटर १५ रुपये

१५ पेक्षा अधिक किलोमीटर २० रुपये

बस भाडे (वातानुकूलित)

५ किलोमीटर ६ रुपये

१० किलोमीटर १३ रुपये

१५ किलोमीटर १९ रुपये

१५ पेक्षा अधिक किलोमीटर २५ रुपये

मुंबईत होणारी वाहतूक कोंडी, शेअर टॅक्सी-रिक्षामुळे होणारी स्पर्धा, प्रवाशांनी फिरवलेली पाठ, यामुळे बेस्टच्या आर्थिक तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत होती. प्रवाशांचा ओढा बेस्टकडे वाढवण्यासाठी बसचे तिकीट दर कमी करण्याची मागणी वारंवार होत होती. अखेर ही मागणी आज मंजूर झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समान सत्तावाटपातही इतके वाट्यास आले नसते, सामनातून काँग्रेसवर बोचरी टीका

News Desk

सोमय्यांची अडवणूक करु नका, त्यांना येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन

News Desk

ठरलं! उद्या दुपारी १ वाजता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल होणार जाहीर

News Desk