HW News Marathi
देश / विदेश

‘ये दिवार तुटती क्यू नही’ अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे – अजित पवार

मुंबई| मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले आहे. तर शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले. ये दिवार तुटती क्यू नही… ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा… एसीसी… बिर्ला सिंमेटसे जो बनी है अशा शब्दात महाविकास आघाडी पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपाला जोरदार टोला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात लगावला.

मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग अजितदादा पवार यांनी यावेळी फुंकले.

आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय घेण्यात यावा असा कायदा केला आहे. शिवभोजन थाळी आपण सुरु केली आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.चुकीचे निर्णय आम्हाला वाटतात ते भाजपाला चांगले वाटतही असतील. ते निर्णय आम्ही जनतेला फायदा होतो की नुकसान होते हे पाहून बदलले आहेत. आमच्या सरकारने कुठलीही विकास कामे थांबवली नाहीत.ज्या कामांच्या बाबतीत शंका येते. म्हणजे समाजाच्या भल्यासाठी जी विकासकामे नाहीत हे लक्षात आल्यावर अशी कामे थांबवली आहे असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

समाजाचं भलं करण्यासाठी पदाचा उपयोग करा. पवार साहेबांना व मला मान खाली घालावी लागेल असे वागू नका असे सांगतानाच आता हौसे नवशे गवशे येतील मात्र त्यांना पदांपासून दुर ठेवा. दोन वर्ष त्यांना काम करु द्या असा आदेश अजितदादा पवार यांनी दिला.पदे मिळाली ते पक्ष सोडून गेले त्यामध्ये सचिन अहिर, संजय पाटील, चित्रा वाघ, प्रसाद लाड असे सगळे निघून गेले आहेत.

मात्र असे कार्यकर्ते शोधा जे सत्ता नसताना आपल्याकडे राहतील. जे कोण चिकटायला आले आहेत. त्यांना दोन वर्ष काही देवू नका. त्याला काम करु द्या असेही अजितदादा पवार म्हणाले.

शिवसेना महानगरपालिकेत एक नंबरवर आहे ती राहिली पाहिजेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेसही दुसर्‍या क्रमांकावर राहिली पाहिजे असेही अजितदादा पवार म्हणाले.२०२२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या आवारातील स्मारक उभे करणारच असे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले.

.

.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणाच्या अंतिम निर्णयावर जमियत उलेमा ए हिंदकडून पुनर्विचार याचिका

News Desk

मीरा कुमार यांना काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी

News Desk

EVM हॅकिंगची कल्पना असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन हॅकरचा धक्कादायक खुलासा

News Desk