HW News Marathi
महाराष्ट्र

‘मातोश्रीवरील बॉय’ उल्लेखावरून नार्वेकरांनी राणेंना चांगलेच सुनावले

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना ‘मातोश्रीवरील बॉय’ असा उल्लेख केला. राणेंनी आज (१६ फेब्रुवारी) मुंबई भाजप कार्यलयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर घाणाघाती हल्ला केला. राणेंच्या ‘मातोश्रीवर बॉय’ उल्लेख केलेल्या नार्वेकरांनी ट्वीट करत त्यांच्यावर प्रत्युत्तर दिले. यानंतर राणेंनी देखील ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे आता नार्वेकर आणि राणे यांच्या ट्वीटवर वाकयुद्ध रंगले आहे. राऊतांनी काल (१५ फेब्रुवारी) पत्रकार परिषदतून ईडी आणि भाजपवर टीका केली आहे.

नार्वेकर ट्वीटमध्ये म्हटले, “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?”. नार्वेकरांनी त्यांच्या ट्वीटमध्ये राणेंना टॅग केले होते. नार्वेकरांच्या ट्वीटला राणेंनी देखील ट्वीट करत उत्तर देत म्हटले, “सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका.” राणेंनी देखील नार्वेकरांना टॅग केले आहे.

राणेंनी पत्रकार परिषदेत नेमके काय म्हणाले

राणेंना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, ” कोण ओ कोण मिलिंद नार्वेकर?, मातोश्रीवर बॉयचे काम करायचे ते काय ?, हो माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिले आहे, बेल मारली की येस सर काय आणू? असे म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, असे म्हणत त्यांनी नार्वेकारांची आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खल्ली उडवली.” राणेंच्या पत्रकार परिषदेत नार्वेकरांचा उल्लेख मातोश्रीवरील बॉय असा केल्यानंतर नार्वेकरांनी ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता!

News Desk

निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायलाच हवे, आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू !

News Desk

सरकारमधील ओबीसी नेते पवार काका पुतण्यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत! – गोपीचंद पडळकर

News Desk