HW News Marathi
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाच्या वेळवरून शिवप्रेमीमध्ये नाराजी

मुंबई | औरंगाबाद मधील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणवरून वाद सुरू आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदल्यामुळे आणि महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आज (१८ फेब्रुवारी) होणार आहे. परंतु, महाराजांचे पुतळ्याचे अनावरण मूक पद्धतीने होणार असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. आणि आता या वादात भाजपने उडी घेतली असून लोकार्पणाची वेळ बदल केल्यामुळे शिवप्रेमींनी चिडले आहेत. यासंदर्भात भाजपने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. 

महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मध्य रात्रीचा मुहूर्त हा हेतुपूर्वक केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केला आहे. यामुळे महाराजांच्या पुतळ्याचे भव्य दिव्य सोहळा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ५ वाजता किंवा १९ तारखेच्या सकाळी मोठ्या उत्साही वातावरणात करण्याची मागणी भाजपकडून केली आहे. महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आज  होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन उपस्थित राहून महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण करणार आहेत. 

महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणाच्या वेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार असून यावेळी शिवप्रेमी मोठ्या जल्लोषात महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, रात्री दहानंतर कोणतेही वाद्य वाजविण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आहे. यामुळे शिवप्रेमी नाराज आहेत. दरम्यान, महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाची वेळ बदला नाही तर रात्री १० वाजल्यानंतर वाद्य वाजविण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी १६ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणा वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित असतील.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशा चौकशा लावून विरोधकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न केला तर…

News Desk

…अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे

News Desk

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एसएफआय करणार राज्यव्यापी आंदोलन

News Desk