HW News Marathi
क्राइम

आमदारांच्या राखीव डब्ब्यात चोरी, २ आमदारांची महत्त्वाची कागदपत्रे आणि पैसे चोरीला

मुंबई | विदर्भ एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात दोन आमदारांचे पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची घटना घडली आहे. आमदारांच्या राखीव डब्ब्यात चोरी झाल्याची घटना घडली आहे. पावसाळी अधिवेशन चालू असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे महत्त्वाची कागदपत्रे आणि पत्नी वृषाली बोंद्र यांची पर्स चोरट्याने पळवली. बोंद्र दांपत्य मलकापूर येथून रविवारी (२३ जून) विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाण्यासाठी बसले होते. तर शिवसेनेचे आमदार आमदार रायमूलकर आणि खेडेकर हे जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने सोमवारी (२४ जून) मुंबईला पोहचले.

या घटनेत चिखली मतदार संगाचे आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांची पत्नी वृषाली बोंद्र यांची पर्स चोरट्याने पळवली. या संपूर्ण प्रकार आज (२५ जून) सकाळी ७ च्या सुमारास कल्याण स्थानकात उतरण्याच्या वेळी राहुल बोंद्रे याच्याकडे महत्त्वाची कागदपत्रांची फाईल आणि पत्नी वृषाली यांच्या पर्समध्ये २६ हजार रुपयांची रोकड आणि एटीएम कार्ड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर हे जालना येथून देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला पोहचले. रायमूलकर हे कल्याण स्टेशनला उतरणण्यासाठी सकाळी उठले. तेव्हा त्यांचा मोबाईल आणि खिशातील १० हजार गायब असल्याचे त्यांना दिसले. शशिकांत खेडेकर यांची बॅग असल्याचे समजून चोरट्याने त्यांच्या पीएची बॅग ब्लेडने फाडली. या दोन्ही घटनांची तक्रार आमदारांनी लोहमार्ग पोलिसांत केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इज्तेमात सहभागी झालेला कर्मचारी निलंबित

swarit

बीडच्या RTO कार्यालयात बोगस कर पावत्या; एजंटवर गुन्हा दाखल

News Desk

बिलोलीत अवैध दारू दुकानावर छापा , 29 जणांवर कारवाई

News Desk