HW News Marathi
Covid-19

….तर मी आताच राजीनामा देईन ! संभाजीराजेंचा मोठा इशारा

मुंबई । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत चालला आहे. त्यातच खासदार संभाजीराजे देखील आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आरक्षणाविषयी समाजाची आणि समाजातील प्रमुखांची भूमिका जाणून घेण्यासाठी संभाजीराजे आजपासून (२४मे) संपूर्ण राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, यावेळी संभाजीराजेंनी एक मोठा इशारा दिला आहे. “मी राजीनामा देऊन जर मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर आताच खासदारकीचा राजीनामा देईन”, असा इशाराच संभाजीराजे यांनी दिला आहे.

संभाजीराजे सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “माझ्या राजीनामा देण्याने जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तात्काळ राजीनामा देईन.” दरम्यान, सध्या मराठा समाजाच्या भावना आणि भूमिका जाणून घेण्यासाठी संभाजीराजे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर येत्या २७ मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते यांच्यासोबत मराठा आरक्षणावर चर्चा करून आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे संभाजीराजेंनी यापूर्वी सांगितले होते.

मराठा आरक्षणाबाबत समाजाची आणि समाजातील प्रमुखांची मते जाणून घेण्यासोबतच संभाजीराजेंनी आपण अनेक कायदेतज्ज्ञांशीही चर्चा केल्याचे सांगितले आहे. संभाजीराजेंच्या राज्यव्यापी दौऱ्यात मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येतील ? काय कायदेशीर मार्ग आहेत ? याची देखील माहिती घेतली जाणार असल्याचे सांगितले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आता घरपोच मिळणार दारू !

News Desk

देशात पुन्हा पुर्ण लॉकडाऊन होणार? अमित शहा म्हणतात…

News Desk

आयएफएससी मुंबईहून गुजरातला हलवण्याला शरद पवारांचा विरोध पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

News Desk