HW News Marathi
महाराष्ट्र

…तर मी मुख्यमंत्र्यांचे नागपूर घेईन !

सातारा | “मला माण मतदारसंघ दिला नाही तर मी मुख्यमंत्र्यांचे नागपूर घेईन”, असे वक्तव्य राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तसेच रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. माण तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी आपण घेणार असून त्यासाठी कितीही खर्च झाला तरीही तो करण्यास आपण तयार असल्याचे देखील जानकर म्हणाले. लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, आता नेत्यांसाठी विधासंभेसाठी आपला अपेक्षित मतदारसंघ मिळविण्याकरिता प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र आहे.

राज्यात यंदा पडलेल्या भीषण दुष्काळात सातारा जिल्ह्यातील माण तालुका प्रचंड होरपळला आहे. याच पार्श्वभूमीवर, यंदाच्या विधानसभा निवडणुकांसाठी आपण माण मतदारसंघाची मागणी करत असल्याचे महादेव जाणकार यांनी म्हटले आहे. आपल्याला माण मतदारसंघाचा कायापालट करायचा असून या भागाला दुष्काळमुख करण्याची जबाबदार आपल्या खांद्यावर घ्यायची असल्याचे जानकर म्हणाले. तसेच, त्यासाठी किती खर्च करण्याची तयारी असल्याचे देखील ते म्हणाले.

“मला माण मतदारसंघ दिला नाही तर मी मुख्यमंत्र्यांचे नागपूर घेईन. मुख्यमंत्री माझे लाड पूर्ण करतील”, असा विश्वासही यावेळी जानकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीला आपण भाजपच्या नव्हे तर रासपच्याच तिकीटावर लढणार असल्याचे देखील महादेव जानकर यांनी सांगितले आहे.

संबंधित वृत्त…

वेळ पडली तर रेल्वेने पाणी आणू | महादेव जानकर

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही मुख्यमंत्र्यांना भावासारखे मानले, पण ते धुर्त होते!, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

Aprna

पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’, फडणवीसांच्या दौऱ्यावर टीका!

News Desk

मलिक झाले बिनखात्याचे मंत्री; ‘या’ मंत्र्यांकडे सोपविली अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी

Aprna