HW News Marathi
महाराष्ट्र

“तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो”, पुण्यात संभाजीराजे आक्रमक!

पुणे। दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचे नाही” असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र राज्य सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. पुण्यात संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला असून पुढील मूक मोर्चा हा नांदेड येथे होणार असल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीवर तर्कवितर्क लढवणाऱ्यांवरही संभाजीराजेंनी निशाणा साधला आहे.

आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं

खासदार संभाजी राजे छत्रपती पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका समांजस्याची असल्याचे सांगितले आहे. मतभेद विसरुन केवळ मराठा समजाला एकत्र आलेल्यांबद्दल राजेंनी समाधान व्यक्त केलं आहे. वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंड पाहत नव्हते ते आज एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचे आहे. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो मात्र आपल्याला ते करायचं नाही. आपण ही लढाई संयमानेच लढायची असल्याचे संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

महाराज मॅनेज झाल्या असल्याच्या चर्चा

जुलै महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली होती. या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. महाराज मॅनेज झाल्या असल्याच्या चर्चा सुरु होत्या, या चर्चांवर संभाजीराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या दिवशी महाराज मॅनेज होतील त्या दिवशी घरी जाऊन बसेल, छत्रपती असे नाही मॅनेज होणार माझ्यावर विश्वास ठेवा असे सडेतोड उत्तर राजेंनी दिलं आहे.

आरक्षण अनेक दिवस चालेल

राज्य सरकारने समाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षणात काही करता येणार नाही. ज्या लोकांना समाजाबद्दल कळतं अशा लोकांना सदस्य केले पाहिजे. माझी भूमिका मी मांडतो आहे. आरक्षण अनेक दिवस चालेल परंतू आपल्या मागण्यांचे काय झाले. मंत्र्यांसोबत २२ मागण्यांसाठी बैठक घेण्यात आली होती. आता त्या मागण्यांबाबत काय झाले. वसतिगृहांबाबत राज्य सरकारने जीआर काढून दाखवावा अता दोन महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करा, रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

‘कोरोनाची तिसरी-चौथी लाट मुद्दाम आणली जात आहे’, राज ठाकरेंचा आरोप

News Desk

महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले!

News Desk