HW News Marathi
Covid-19

मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होणार नाही !

मुंबई | महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने काल (८ मे) चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

राष्ट्रवादीकडून महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपालाताई चाकणकर, अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांच्या नावांच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. मात्र, शशिकांत शिंदे यांनी ट्विटर हँडलवरूनही त्यांच्या नावाच्या चर्चेवरू माहिती दिली आहे. शशिकांत शिंदेंनी लिहिले, “एका वर्तमानपत्रात विधानपरिषद निवडी सोबत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडी बाबतच्या चर्चेची बातमी आलेली आहे, प्रदेशाध्यक्ष निवडी बाबतच्या बातमीत कोणतेही तथ्य नसून फक्त विधानपरिषद निवडी संदर्भात माझे नाव चर्चेत आहे. दुसरी कोणत्याही प्रकारची चर्चा सध्य परिस्थितीत नाही.”

मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता | शशिकांत शिंदे

“मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, मला संधी मिळाली तर आजवर लोकांसाठी काम केले. तसेच काम करेन,” असा विश्वास राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. विधानपरिषदेवर राष्ट्रवादीकडून इच्छुक आहात का असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले ,”शेवटी विधानपरिषदेवर संधी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतात. पण संधी मिळाली तर लोकांची सेवा करेन,” विधानपरिषदेवर शशिकांत शिंदे यांचे नाव राष्ट्रवादीकडून आघाडीवर आहे.

शशिकांत शिंदे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, शिंदेना पराभवाचा सामना करावा लागला. शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर शरद पवारांना सुद्धा धक्का बसला होता आणि ते श्रीनिवास पाटलांच्या विजयाचा आनंद साजरा करायला साताऱ्याला गेले नव्हते. शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांचे नाते अत्यंत जवळचे आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावान म्हणून त्यांचे विधानपरिषदेवर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित बातम्या

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु होणार’, महापौर मुरलीधर मोहोळांची माहिती

News Desk

कर्नाटक सरकारकडून 1250 कोटी रुपयांचं कोविड मदत पॅकेज जाहीर

News Desk

आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येने ७० हजारांचा टप्पा ओलांडला

News Desk