HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

चौकशी व्हावी, सत्य बाहेर येईल ! पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आठवलेंची प्रतिक्रिया

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधात २ महिन्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर अत्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक आक्रमक वळण लागले. दरम्यान, यंदाच्या प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर जो काही प्रकार घडला त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. “लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते”, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार यांच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना रामदास आठवले म्हणतात की, “शरद पवारांच्या म्हणण्यात कोणतेही तथ्य नाही. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील हल्ला भाजपने घडवून आणला यात तथ्य नाही. खरंतर, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी द्यायला नको होती. यावेळी शेतकरी आंदोलनामध्ये कुणी आतंकवाद्यांनी शिरुन हल्ला केला. शरद पवार जुने जाणते नेते आहेत. या प्रकणाची चौकशी व्हावी म्हणजे सत्य बाहेर येईल.”

शरद पवार काय म्हणाले होते ?

शरद पवार शनिवारी (१३ फेब्रुवारी) सोलापूरात झालेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, “प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते. तर त्यात सत्ताधारी गटाचे काही घटक होते.”

Related posts

मौनी मोदी, बँक घोटाळ्यावर शांत का ?  कॉंग्रेसची मोदींवर टीका

Ramdas Pandewad

डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द ! राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन…

News Desk

देशातील कोरोना रुग्ण संख्या घटली!

News Desk