HW Marathi
महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीदरम्यान दोन गटात बाचाबाची

मुंबई | औरंगबादमध्ये आज (५ मार्च) मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक बोलविण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये बैठक संपल्यानंतर दोन गटात वाद बाचाबाची झाली आहे. बैठकीचा आणि गोंधळाशी काहीही संबंध नसून दोघांमध्ये वैयक्तिक वाद असल्याचे मराठा मोर्चाच्या संयोजकांनी सांगितले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर २१ प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यात याव्या. या मागण्या सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्यावा. अन्यथा मराठा क्रांती मोर्चा सरकारच्या विरोधात भूमिका घेईल असा इशारा आज झालेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिला आहे.

राज्यात सुरू असलेल्या नोकर भरतीत खुल्या प्रवर्गातील पदे न भरण्याचा आणि मराठा समाजाला देऊ केलेल्या आरक्षणानुसार पदभरती न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (६ मार्च) यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Related posts

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता उद्या भाजपचे राज्यभरातील बँकांसमोर आंदोलन 

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. नरेश पाटील यांच्या नेमणुकीची शिफारस ?

Gauri Tilekar

नारायण राणेंचा शिवसेनेवर पुन्हा एकदा प्रहार  

News Desk