HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल अभिभाषण न करता विधानसभेतून निघून गेले; ‘मविआ’ नेत्यांचे आंदोलन

मुंबई | राज्याचे राज्यपाला भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषण न करता विधानसभेतून निघून गेले. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे राज्यपाल अभिभाषण न करात सभागृहातून निघून गेले. राज्यपालांनी गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शिवसैनिकांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३ मार्च) सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यापांचे भाषण होते. यानंतर राज्यभालांच्या भाषणावर दोन्ही सभागृहात चर्चा होते. राज्यपाल अभिभाषण न देता निघून गेल्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी विधीमंडळाच्या पाऱ्यांवर आंदोलन करत आहे. राज्यपाल हटाव आणि महाराष्ट्र बचाव, अशा घोषणाबाजी करत राज्यपालांविरोधात आंदोलन करत आहे.  राज्यपाल राष्ट्रगीतासाठी न थांबता सभागृहातून निघून गेले,यावरूनही टीका करायला सुरुवात केली. 

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकासआघाडी सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भाजपच्या नेत्यांनी हतात फलक घेऊन विधीमंडळाच्या पाऱ्यांवर मलिकांविरोधात आंदोलन केले. भाजपने हातात घेतलेल्या फलकावर ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहेत का??, असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. तर ‘ ‘दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, आशा घोषाबाजी करत भाजपने नवाब मलिक आणि महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. या आंदोलनात विधासभा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपेचे नेते गोपीचंद पडळकर, भाजपचे आमदार अतुल भातकळकर, भाजपचे नेते आशिष शेलार आदी नेते आंदोलनात सहभागी झाले.

राज्यापाल नेमके काय म्हटले

राज्यपालांनी रविवारी (२७ फेब्रुवारी) औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्यव्य केले आहे. राज्यपाल म्हणाले, “चाणक्य शिवाय चंद्रगुप्तला कोण विचारेल, तर समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल?, मी चंद्रगुप्त किंवा शिवाजी यांना लहान दाखवत नाही. या प्रत्यकामागे त्यांच्या आईचे मोठे योगदान आहे. तसेच आपल्या समजात गुरूचे मोठे स्थान आहे. शिवाजी महाराजांनी म्हटले, समर्थ रामदास स्वामींच्या कृपेने मला राज्य मिळाले. आपल्या देशाची परंपरा आहे. तर गुरुदक्षिणा द्यावी लागते. मी जिंकलो, राज्याची स्थापना झाली आणि मी रायगडावर आलो. आता गुरुदक्षइणा म्हणून तुम्ही राज्याची चावी तुम्हाला देतो, असे शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले. पण, समर्थांनी महाराजांकडून चावी घेतली नाही, समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना ते राज्याचे विश्वस्त असल्याचे सांगितले. तसेच हा भाव सदगुरूकडे होता,” असे ते म्हणाले.

Related posts

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ! – देवेंद्र फडणवीस

Aprna

नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना मदत करा! : नाना पटोले

News Desk

माझी वेळ इतर महत्त्वाच्या मुद्द्यांना दिली तर आभाळ कोसळेल का? कुणाल कामराचे आणखी एक ट्विट 

News Desk