HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले तेव्हा या मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे होती – अबू आझमी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नव्हते. महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले. ते आज (४ मार्च) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेचे नेते नाहीत, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. ही खूपच दुख:द घटना आहे. हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामने चालते. उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले तेव्हा या मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे होती.

बाबरी मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लीम नेत्यांनी एव्हाना राजीनामा द्यायला पाहिजे होता, असे अबू आझमी यांनी म्हटले.उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?भाजपने आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये, तुमची तेवढी पात्रता नाही. बाबरी मशीद पडल्यानंतर सगळे येरेगबाळे पळून गेले, पण बाळासाहेब ठाकरे एकटे ठामपणे उभे राहिले. बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे बाळासाहेबांनी म्हटले होते.केंद्रात सहा वर्ष भाजपची सत्ता असताना राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपने कायदा केला नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर आता भाजप राम मंदिराच्या नावाने वर्गणी गोळा करत आहे. मात्र, या सगळ्यानंतर राम मंदिराचे शिल्पकार म्हणून भाजपला आपलेच नाव हवे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून मुख्यमंत्री विधानपरिषदेवर जाणार

swarit

कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही – अजित पवार

News Desk

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून 5 लाख रुपये मिळणार

Aprna